महाअपडेट टीम, 2 फेब्रुवारी 2022 : शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अशोकबापू पवार यांनी सध्या तालुक्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. सध्या गावा – गावात विकासकामांचे उदघाटन, भूमिपूजन सुरु असून आता आ.अशोकबापू पवार हे निमोणे गावाच्या विकासकामांसाठी थेट मंत्रालयात पोहचले आहे.
आज मुंबई मंत्रालय येथे आ.अशोकबापू पवार व शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.रवीबापू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निमोणे गावच्या पाणीपुरवठा योजना संदर्भात महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा.गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले.
तसेच निमोणे ते कर्डे एमआयडीसी रस्ता कामासाठी उद्योग व खनिकर्म, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदितीताई तटकरे यांना निवेदन दिले.
निमोणे येथे सर्व कार्यालय एकाच छताखाली आणण्याकरिता अद्ययावत ग्रामसचिवालय इमारती साठी निधी मिळणेकरीता राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब यांना निवेदन दिले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे जलसंपदा मंत्री .मा. जयंत पाटील साहेब, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा.धनंजय मुंडे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
निवेदन देते वेळी निमोणे गावचे कार्यक्षम सरपंच मा.श्यामभाऊ काळे, ग्रा.पं. सदस्य मा.संजय आबा काळे, मा.प्रशांत अनुसे,मा.बापू सूर्यवंशी,मा.भाऊसाहेब काळे पाटील,युवा नेते मा. सुभाष गव्हाणे,मोटेवाडीचे माजी सरपंच मा.सुरेश कोल्हे,माजी उपसरपंच मा.विजय पोटे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मा.दिलीपराव काळे,इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.