महाअपडेट टीम, 28 फेब्रुवारी 2022 : अशोक पवारांनी मतदार संघातील प्रत्येक गावचा विकास कामांच्या माध्यमातून चेहरा – मोहरा बदलायला सुरूवात केली आहे. विकास कामांच्या भूमिपुजनांचा आणि उद्घाटनांचा नुसता सपाटाच लावला आहे.
गुनाट आणि शिंदोडी येथे विविध विकास कामांचं भूमिपुजन उरकून गुनाट गावचे युवा सरपंच गणेश कोळपे यांच्या घरी रात्री’च्या बारा वाजता स्नेहभोजनाला हजेरी लावली.
आमदार अशोक पवार हे कोळपेवाडी येथे स्नेहभोजनाला येणार म्हटल्यांवर ग्रामस्थांमध्ये उत्साहचं, आनंदाचं वातावरण होतं. अशोक पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. पण वेळेचं नियोजन विस्कटल्यामुळे आमदार साहेब स्नेहभोजनाला येतील की नाही? असाही प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. तरी पण ग्रामस्थ आतूरतेने वाट पाहत होते.
अखेर, रात्री’च्या बारा वाजता आमदार साहेब स्नेहभोजनाला उपस्थित राहिले. आमदार साहेबांसमवेत, तालुकाध्यक्ष, रविबापू काळे, जि.प.सदस्य, राजेंद्र जगदाळे, खरेदी-विक्री’चे चेअरमन, राजेंद्र नरवडे, पुणे जि.नियोजन समिती’चे सदस्य, पंडीतअप्पा दरेकर आदि स्नेहभोजनाला उपस्थित होते.
आमदार साहेबांना स्नेहभोजनाला यायला उशीर झाला तरी ग्रामस्थांमध्ये उत्साहचं, आनंदाचं वातावरण टिकून होतं. स्नेहभोजन झाल्यानंतर आमदार साहेबांनी ग्रामस्थांशी दिलखुलासपणे संवाद साधला. आणि समस्याही जाणून घेतल्या.