नवी दिल्ली : भारताचा सध्याचा एकदिवशीय कर्णधार शिखर धवनने शुक्रवारी (25 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक झळकावून अनेक विक्रम मोडीत काढले. धवनने 77 चेंडूंचा सामना केला आणि 13 चौकारांच्या (52 धावा) सहाय्याने 72 धावांची शानदार खेळी केली. धवनने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. धवन आणि गिलची 9 डावातील ही चौथी शतकी भागीदारी आहे.

शिखर धवनने भारतासाठी 50 व्यांदा 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केली आहे. ही कामगिरी करणारा तो भारताचा चौथा खेळाडू आहे. या यादीत त्याच्या आधी सचिन तेंडुलकर (103), सौरव गांगुली (67) आणि वीरेंद्र सेहवाग (58) या दिग्गजांनी हा पराक्रम केला होता.

या अर्धशतकी खेळीसह धवनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण केल्या आहेत. हा आकडा गाठणारा तो आठवा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर (21999), सौरव गांगुली (15622), राहुल द्रविड (15271), विराट कोहली (13786), एमएस धोनी (13353), मोहम्मद अझरुद्दीन (12941) आणि युवराज सिंग (12663) यांनी भारतासाठी हा टप्पा गाठला आहे.