महाअपडेट टीम, 30 जानेवारी 2022 : बुलेट निर्माता आयशर मोटर्सने गुंतवणूकदारांना करोडपती केलं आहे. कंपनीने खूपच जबरदस्त रिटर्न्स दिले आहे. आयशर मोटर्सच्या (Eicher Motors ) शेअर्सनी गेल्या 20 वर्षांत 80,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहे.
कंपनीच्या शेयर्सनी गेल्या 10 वर्षांत 1,500 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहे. आयशर मोटर्सच्या (Eicher Motors) स्टॉकमध्ये 10,000 रुपये ठेवणारे गुंतवणूकदारही लाखो रुपयांचे मालक झाले आहेत.
10 हजारांचे झाले तब्बल 82 लाख :-
25 जानेवारी 2002 रोजी आयशर मोटर्सचे (Eicher Motors) शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 3.17 रुपयांच्या पातळीवर होते. 28 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 2609.30 रुपयांवर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेयर्सनी 82,300% अधिक रिटर्न्स दिले आहे.
जर एखाद्या व्यक्तीने 25 जानेवारी 2002 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आजपर्यंत हे पैसे 82.31 लाख रुपये झाले असते. म्हणजेच गुंतवणूकदाराला 82 लाख रुपयांपेक्षा अधिकचा थेट फायदा झाला असता…
1 लाख रुपये गुंतवणारे झाले करोडपती…
जर एखाद्या व्यक्तीने 25 जानेवारी 2002 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर, सध्या ही रक्कम 8.2 कोटी रुपये झाली असती. म्हणजे 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारी व्यक्ती 20 वर्षांत 8 कोटींची मालकीण असते.
आयशर मोटर्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3,018.80 रुपये आहे. त्याच वेळी, स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 2,303.75 आहे. आयशर मोटर्सचे मार्केट कॅप 7,1300 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.