शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा काँग्रेस (Congress) पक्षाला डिवचले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) राऊतांच्या या टीकेमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘UPA संदर्भात मी उद्धव ठाकरे यांच्याची बोलणार आहे. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कुणी करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. काँग्रेस पक्षानं UPA साठी प्रयत्न करावेत.
UPA कुणाची खासगी जागीर नाही. भाजप (Bjp) विरोधात ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) प्रयत्न करत आहेत. केजरीवाल प्रयत्न करत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) एक भीष्म पितामह आहेत. काँग्रेसकडून मात्र कुठलीही जबाबदारी दिसत नाही’, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिल्लीतील मेळाव्यात शरद पवार यांना UPA चे अध्यक्षपद देण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव शरद पवार यांच्या उपस्थितीतच मंजूर करण्यात आला आहे.
मात्र यावरून आता काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे समजत आहे. मात्र संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच UPA बाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.
तसेच सतीश उके यांच्यावर सुरु असलेल्या ईडीच्या धाडीवरही संजय राऊत बोलले आहेत. ते म्हणाले, ईडीच्या धाडी या आता चिंतेचा नाही तर गमतीचा विषय बनलाय.
उके लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येतेय. आम्ही अनेकांविरोधात पुरावे दिले, पण त्यावर कारवाई केली गेली नाही. न्यायाचा तराजू सरळ हवा पण तो तसा नाही, अशी टीकाही संजय राऊतांनी आहे.