मुंबई : बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर पुन्हा एकदा तिच्या सुपर रिव्हिलिंग फोटोंमुळे चर्चेत आली आहे. हे फोटो शनायाने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. चला एक नजर टाकूया या खास फोटोंवर.

संजय कपूरची मुलगी शनाया कपूर बॉलीवूडमध्ये लवकरच पाऊल ठेवणार आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चर्चेत असते. या मागचे कारण आहे तिचा ग्लॅमरस आणि किलर लूक. दरम्यान, या अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचे काही टॉपलेस फोटो शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

फोटोंमध्ये, ती डेनिम जॅकेट-जीन्समध्ये दिसत आहे, परंतु तिच्या जॅकेट घालण्याच्या शैलीने चाहत्यांना तिचे फोटो पुन्हा-पुन्हा पाहण्यास भाग पाडले आहे.

फोटोमध्ये, टॉपलेस शनाया रिव्हर्स जॅकेटमध्ये खूपच आकर्षित दिसत आहे. तसेच तिचा हॉट अवतार पाहून सर्वजण तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

फोटोत, विस्कटलेले केस आणि सैल फिटिंग कपड्यांमध्ये शनायाचे सौंदर्य खूपच खुलले आहे.

हे फोटो शेअर करताना शनाया कपूरने कॅप्शनही खास दिले आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये बनत असलेल्या ‘बेधडक’ या आगामी चित्रपटातून शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत गुरफतेह पिरजादा आणि लक्ष्य लालवानी मुख्य भूमिकेत आहेत.

‘बेधडक’ चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहेत. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे.