मुंबई : लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी शहनाज गिल सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ‘बिग बॉस 13’ मध्ये आल्यानंतर शहनाज गिल लोकप्रिय झाली आणि प्रत्येकाच्या आवडत्या यादीत तिचा समावेश झाला. आज ती केवळ पंजाबची कतरिनाच नाही तर संपूर्ण देशाची चहेती झाली आहे. शहनाज गिलची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ काही मिनिटांत व्हायरल होतात. नुकताच तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

शहनाज गिलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये काही लोकांसह ‘धडक’ चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती ‘झिंगाट’ची सिग्नेचर स्टेप करत आहे. तिचा हा डान्स पाहून चाहते वेडे झाले आहेत.

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा हा डान्स लोकांना खूप आवडला. लूकबद्दल बोलायचे झाले तर शहनाज गिल पांढऱ्या रंगाच्या मिडीमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

शहनाज गिल आता लोकप्रिय स्टार बनली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. तिचा ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ नावाचा चॅट शोही सुरू झाला आहे. पूर्वी राजकुमार राव तिच्या चॅट शोचा पहिला पाहुणा म्हणून दिसला होता.