नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीचा (Shahid Afridi) माजी सहकारी दानिश कनेरियाने (Danish Kaneria) त्याच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दुसरीकडे शाहिद आफ्रिदीने आपल्या संघाचा माजी खेळाडू दानिश कनेरियाला अपशब्ध न वापरता नाव न घेता भारताला आपला शत्रू देश म्हटले. कनेरियाने आफ्रिदीवर त्याच्या खेळण्याच्या दिवसात गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.
दानिश कनेरियाने शाहिद आफ्रिदीला खोटारडे आणि चारित्र्यहीन व्यक्ती म्हटले आहे. याशिवाय कनेरियाने आरोप केला होता की आफ्रिदीने त्याच्या आस्था आणि धार्मिक श्रद्धेसाठी देखील आपल्याला लक्ष्य केले आणि त्याला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले.
या सर्व दाव्यांचे खंडन करताना आफ्रिदीने सांगितले की, “त्यावेळी तो स्वतःला धर्माचा अर्थ समजत होता. आफ्रिदीने कनेरियाच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून हा आरोप केवळ स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी असल्याचा दावा केला आहे.
एका प्रसिद्ध वृत्तानुसार आफ्रिदी असे म्हटले आहे की, “हे सर्व सांगत असलेल्या व्यक्तीचे चारित्र्य पहा. कनेरिया माझ्या लहान भावासारखा होता आणि मी त्याच्यासोबत अनेक वर्षे खेळलो आहे. जर माझी वृत्ती वाईट असेल तर त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किंवा ज्या विभागासाठी तो खेळत होता त्या विभागाकडे तक्रार का केली नाही.”
आफ्रिदी पुढे म्हणाला, “तो आपल्या शत्रू देशाला मुलाखती देत आहे ज्यामुळे धार्मिक भावना भडकावू शकतात”. कनेरियाने असा दावा केला होता की आफ्रिदीला मी पाकिस्तान संघाचा भाग नको होतो आणि तो ईर्षेपोटी असे करत होता.
लेगस्पिनर कनेरियाने पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामन्यांमध्ये 261 विकेट घेतल्या आहेत. त्याने 18 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत ज्यात त्याने 15 विकेट घेतल्या आहेत. 2009 इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप प्रो-लीग सामन्यांमध्ये स्पॉट-फिक्सिंगसाठी 2012 मध्ये ईसीबीने त्याच्यावर बंदी घातली होती.