मानवी जीवनात अन्न, वस्त्र, निवारा, या तीन मूलभूत गरजा आहेत. यापैकी एक म्हणजे वस्त्र म्हणजेच कपडे ही आता महागणार आहेत. कारण कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कापूस हा देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात म्हणजेच ५० हजाराच्या पुढे विकला जाणार आहे. यामुळे कापडचेही दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. अनेकजण यात्रा, सण-उत्सव या काळात नवीन कपडे खरेदी करत असतात. आता ही कपडे महाग होणार आहेत. यामुळे सर्व सामान्य माणसाला एक मोठा धक्काच बसणार आहे.
देशांतर्गत बाजारात कापसाच्या किमती नव्या उच्चांकावर आहेत. MCX वर कापसाची किंमत कधीही ५० हजारांच्या च्या पुढे जाऊ शकते. जागतिक बाजारपेठेतही कापसाचे दर वाढले असून 11 वर्षांचा उच्चांक गाठला आहे.
महागड्या कापूसमुळे कपड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर कापसाची कमतरता आणि वाढती मागणी यामुळे त्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सूतगिरण्यांकडून जोरदार मागणी आल्याने भावाला आधार मिळत आहे. अमेरिकेतील दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सरकार कापसावर लक्ष ठेवून आहे. याबाबत वस्त्रोद्योगमंत्र्यांनी १७ मे रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत वस्त्रोद्योग, सूत उद्योग आणि कापूस संघटनाही सहभागी होणार आहेत. या बैठकीपूर्वी सरकारने कापूस संघासोबत बैठक बोलावली आहे. 13 मे रोजी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियासोबत ही बैठक होणार आहे.
सरकारने एप्रिलमध्ये कापसावरील शुल्क 10% कमी केले होते. एप्रिलमध्ये ड्युटीकर मध्ये या मोठ्या कपातीनंतरही त्याच्या किमती कमी झालेल्या नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कापसावरील उपकर कमी करण्याच्या प्रस्तावावर पुन्हा विचार केला जाऊ शकतो.