महाअपडेट टीम, 29 जानेवारी 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्याची कोविड आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रुग्णस्थिती, उपाययोजना आदींचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुण्यातल्या शाळा, कॉलेज 1 फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात पहिली ते 8 वी पर्यंत चार तासच शाळा भरवली जाणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी वर्गात मास्क न काढताच राहायला हवं. या साठी विद्यार्थ्यांनी दुपारचं जेवण हे घरी करावं हा यामागचा उद्देश आहे.

तसेच नववी आणि दहावीचे वर्ग पूर्णवेळ सुरु राहणार आहे. परंतु मुलांना शाळेत पाठवायचं की नाही हे सर्व पालकांवर अवलंबून असणार आहे. पालकांवर कुठलीही जबरदस्ती करण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आता विद्यार्थ्यांचं लसीकरणही होणार शाळेतच…

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजित पवार म्हणाले…

एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली असून त्यांनी एसटी आता पूर्वपदावर यायला पाहिजे. एसटी बाबत अनिल परब यांनी शेवटची संधी दिली. माझी कामगारांना विनंती आहे की, सर्वसामान्यांसाठी सामंजस्यची भूमिका घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुण्यातील झालेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मा. गृहमंत्री श्री.दिलीप वळसे-पाटील साहेब, शिरूर लोकसभेचे खासदार अमोलजी कोल्हे, आमदार अँड. अशोकबापू पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार चेतनदादा तुपे,

आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री दादांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने गेल्या २ वर्षांपासून जिल्ह्यातील कोविड परिस्थिती अतिशय संवेदनशीलपणे हाताळली आहे. त्यामुळे मृत्यूवर व संसर्गावर नियंत्रण प्रस्थापित करता आले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *