महाअपडेट टीम, 1 फेब्रुवारी 2022 : मा. श्री. अनिल नटू भोईर व मा. श्री. रमेश लोहकरे सरपंच यांच्या सौजन्यांने,आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी आहुपे खोऱ्यातील आहुपे गावात ‘सरपंच चषक’ या भव्य फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम् क्रमांक:- 44,444
व्दितीय क्रमांक:-33,333
तृतीय क्रमांक:- 22,222
चतुर्थ क्रमांक:- 11,111

या स्पर्धेमचे वैशिट्य म्हणजे कोव्हीड चे सर्व नियम पाळून, जास्तीत जास्त संघानी आपला सहभाग नोंदवला. ही स्पर्धा 19 जानेवारी ते रविवार 23 जानेवारी या कालावधीत पार पडली.

या स्पर्धेमध्ये एकुन 40 संघानी आपला सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळीने खेळाडूंने प्रक्षेकांची मने जिकंली.

या पैंकी ज्या चार संघानी सर्वोत्कृष्ट खेळ केला,ते संघ नंबर दाखल सेमी फायन मध्ये जाऊन पोहचले,23 जानेवारी रोजी ‘केडे पाटील’ मैदानावर टेनिस क्रिकेटचा फायनलचा थरार रंगला.

सर्वोत्कृ खेळ केल्याने खालील संघाने आपले नाव सरपंच चषकावरती कोरले:-

1) प्रथम् क्रमांक:- लायन हार्टेड 11 जांभोरी या संघाने 44,444 रूपये भव्य चषक मिळवून प्रथम क्रमांक पटकविला. या संघाचे संघ मालक मनोहर केंगले गुरूजी, सुरज प्रकाशराव घोलप याचे सहकार्ये मोलाचे राहिले.

2) व्दितीय क्रमांक:- काळभैरव क्रिकेट क्लब आहुपे.33,333 रूपये भव्य चषक मिळविला.

3) तृतीय क्रमांक:- मुरबाड तालुक्यातील खपाचीवाडी यांनी२२,२२२ रूपये भव्य चषक मिळविला.

4) चतुर्थ क्रमांक :- तेरूंण क्रिकेट क्लब संघाने 11,111 रूपये भव्य चषक पटकविला.

बक्षिस वितरण समारंभावेळी जांभोरी गावचे पोलीस पाटील श्री. नवनाथ दत्तात्रय केंगले, सरपंच विलास केंगले, श्री. अशोक पेकारी (सामाजिक कार्यकर्ते ), लक्ष्मण मावळे. मारुतीदादा केंगले युवानेते हे मान्यवर उपस्थित होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *