बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान कायम आपल्या हास्य स्वभावामुळे सर्वांच्या पसंतीस उतरले. ती पॅपाराझीशीही चांगल्या पद्धतीने संवाद साधताना दिसत असते. मात्र, नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात सारा चक्क पॅपाराझींवर चिडल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
त्याचे झाले असे की, सारा तिच्या शूटिंगच्या सेटवरुन बाहेर पडताना फोटोग्राफर्स गर्दी करतात. यादरम्यान एकजण साराला धडकतो आणि त्यामुळे सारा गडबडीत गाडीत जाऊन बसते. त्यानंतर ती फोटोज काढण्यासाठी पोज देत नाही. पॅपाराझींनी फोटो काढण्यासाठी विनंती केल्यानंतर ती म्हणते की मग तुम्ही धक्का मारता.अशाप्रकारे वैतागल्याचा साराचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, साराचा हा व्हिडीओ विरल भयानी पेजवरुन देखील शेअर करण्यात आल्या आहे. यावेळी बसाराने शांतपणे पॅपाराझींना रिप्लाय दिल्याचे पाहूनही तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास सारा विकी कौशलस एक चित्रपट करत आहे, या सिनेमाचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तर सारा ‘नखरेवाली’ आणि ‘गॅसलाइट’ सिनेमातही दिसणार आहे.