मुंबई : सारा अली खानचे ताजे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. साराच्या या ताज्या फोटोंमध्ये तिचा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. यासोबतच सारा अली खानचे हे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पापाराझी सारा अली खानला दररोज वर्कआउट करताना पाहत असतात. यावेळी अभिनेत्री पुन्हा एकदा स्पॉट झाली. यादरम्यान सारा अली खानचा लूक चर्चेत राहिला असून सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.

यादरम्यान साराने असे कपडे घातले होते जे ट्रोलर्सना अजिबात आवडले नाही आणि कपड्यांमुळे अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. समोर आलेल्या फोटोंमध्ये, सारा यावेळी क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्समध्ये दिसली. साराने घातलेल्या शॉर्ट्सची लांबी इतकी कमी होती की शॉर्ट्सचे खिसेही त्यापेक्षा लांब होते.

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे हे फोटो समोर येताच ती यूजर्सच्या निशाण्यावर आली. एका यूजरने लिहिले – ‘साराच्या खिशाइतकी पण तिची पॅन्ट नाही.’ यासोबतच अनेक यूजर्स साराच्या कपड्यांवर कमेंट करत आहेत.

सारा अली खानने बरेच वजन कमी करून स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले आहे आणि हा प्रवास अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. साराला पाहण्यासाठी दररोज पापाराझी घराबाहेर पडतात आणि तिच्या लूकबद्दल बरीच चर्चा होते. जवळपास ती रोजच जिम, योगा येत-जात असताना दिसते. त्याच वेळी, सारा पुन्हा एकदा स्पॉट झाली, तिचे पोट पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटले.