मुंबई : साऊथची सुपरस्टार सामंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जेव्हापासून अभिनेत्रीने तिच्या आजारपणाबाबत खुलासा केला आहे, तेव्हापासून प्रत्येकजण तिच्याबद्दल काळजी करत आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते की हा आजार बरा होण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ लागत आहे.

रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सामंथाने ही पोस्ट शेअर केली तेव्हा तिचा एक्स पती नागा चैतन्य आणि त्याचे वडील नागार्जुन यांनी तिला भेटण्याची योजना आखली. मात्र, दोघांनी सामंथाची भेट घेतली की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. नागा चैतन्यने सामंथाला फोन करून तिची तब्येत जाणून घेतल्याचे देखील काही अहवालात म्हंटले आहे.

बॉलीवूड लाईफच्या रिपोर्ट्सनुसार, सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य या दोघांचा घटस्फोट झाल्यापासून ते एकमेकांशी फक्त व्यावसायिक संबंधात आहेत. असे म्हटले जात आहे की दोघेही एकत्र प्रोजेक्ट करताना दिसणार आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा चाहत्यांना या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

बॉलीवूड लाईफला माहिती देताना, सूत्राने सांगितले की, “त्यांची जोडी चाहत्यांमध्ये किती हिट झाली आहे हे दोघांनाही ठाऊक आहे. ज्याप्रकारे नागा चैतन्यने सामंथाविषयी चिंता व्यक्त केली आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की घटस्फोटानंतरही दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. दोघेही अशा ठिकाणी उभे आहेत जिथे त्यांचे एकमेकांशी कोणतेही वैर नाही. दोघांनाही एकमेकांसोबत प्रोफेशनली काम करायचे ठरवले आहे.”

काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर सामंथा रुथ आणि नागा चैतन्य यांनी लग्न केले. दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. त्यांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडते. दोघांनी ‘ओह बेबी’, ‘माजिली’ आणि ‘ये माया चेसावे’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत. 2021 मध्ये दोघांनी त्यांच्या घटस्फोटाची बातमी मीडियात दिली होती.