मुंबई : कंगना राणौतने (Kangana ranout) अलीकडेच दावा केला आहे की ईदच्या पार्टीत सेलिब्रिटींनी ‘धाकड’ चित्रपटाची जोरदार प्रशंसा केली होती परंतु ते सार्वजनिकपणे काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.

कंगनाच्या या विधानानंतर ‘बॉलिवुडच्या भाईजान’ने ते काम केले जे त्याने कंगनासाठी यापूर्वी कधीही केले नसेल. सलमान खानने कंगना राणौतचा आगामी अॅक्शन चित्रपट ‘धाकड’चा दुसरा ट्रेलर शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

कंगना राणौतचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘धाकड’चा दुसरा ट्रेलर गुरुवारी (11 मे) रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित होताच, सलमान खानने ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आणि कंगना तिच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

‘धाकड’च्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये कंगनाचे जबरदस्त अॅक्शन सीन्स आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाची हॉलिवूड चित्रपटांशी तुलना करत आहेत. चाहते ट्रेलरचे जोरदार कौतुक करत आहेत. धडकचा हा ट्रेलर शेअर करताना सलमान खानने लिहिले, ‘टीम धाकडसाठी खूप खूप अभिनंदन.’ या पोस्टमध्ये सलमानने कंगना राणौत, अर्जुन रामपाल आणि निर्माता सोहेल मकलाई यांना टॅग केले आहे.

सलमान खानची ही पोस्ट पाहिल्यानंतर कंगना रनौतने सोशल मीडियावर लगेच त्याचे आभार मानले. सलमानच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करताना कंगनाने इन्स्टा स्टोरीवर लिहिले, ‘धन्यवाद दबंग हिरो, ज्याचे हृदय सोन्यासारखे आहे. या इंडस्ट्रीत मी एकटी आहे असे मी आता कधीच म्हणणार नाही. संपूर्ण धाकड टीमच्या वतीने धन्यवाद.

Leave a comment

Your email address will not be published.