मुंबई : सैफ अली खान (saif ali khan) चार मुलांचा बाप आहे. सैफ आपल्या प्रत्येक मुलावर खूप प्रेम करतो आणि त्यांची विशेष काळजी घेतो. सारा अली खान (sara ali khan) आणि इब्राहिम अली खान (ibrahim ali khan) अशी सैफची पहिली पत्नी अमृता सिंगपासून दोन मुले आहेत. इब्राहिममध्ये सैफ त्याची व्यक्तिरेखा पाहतो. सैफने आपल्या मुलाला माझ्यासारखाच सरळ असल्याचे म्हंटले आहे.
सध्या सैफ अली खान ‘विक्रम वेध’मध्ये काम करत आहे. यात त्याच्यासोबत हृतिक रोशन देखील आहे. याशिवाय तो प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ करत आहे. तर सैफचा मुलगा इब्राहिम अली खान चित्रपट निर्माता करण जोहरसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे.
एका मुलाखतीत सैफ अली खानने सांगितले की, “मला इब्राहिमच्या करिअरची काळजी वाटत आहे पण तो खूप मेहनत घेत आहे याचा आनंद आहे. शालेय जीवनातही तो खूप चांगला होता, त्यामुळे इतर पालकांप्रमाणेच मीही त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
सैफ अली खानने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, “मीही इब्राहिमसारखा होतो. या वयात तुम्ही सरळ आणि साधे असयला पाहिजे जे मला इब्राहिममध्ये दिसते आणि ते चांगले आहे पण भविष्यात ही वृत्ती योग्य असेलच असे नाही.”