आधी मराठा आरक्षण आणि आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उघड आव्हान दिले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँकेत आपला पॅनल उभा करण्याची घोषणा सदावर्ते यांनी केली. त्यावेळी त्यांनी पवार यांचा उल्लेख वयोवृद्ध पुढारी असा केला आणि आम्ही यंग हिंदुस्तानी असल्याचे म्हटले.


एसटी सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे तुम्ही या निवडणुकीत पॅनल उभा करून थेट पवारांना आव्हान देत आहात का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला त्यावर सदावर्ते म्हणाले, “आम्ही यंग हिंदुस्तानी आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्याशी आमची कसली लढाई? ते काय बँकेचे मालक आहेत का? सभासद आहेत का? कोणत्याही वयोवृद्ध पुढाऱ्यांशी आमची लढाऊ नाही.

सहकारातील आणि कष्टकऱ्यांची प्रगती साधायची आहे. ही प्रगतीच देशाची प्रगती आहे. एसटी बँकेत आमचे ९५ टक्के सभासद आहेत. आमची लढाऊ ही आम्ही विना दारु, विना प्रलोभनाची लढू.

Leave a comment

Your email address will not be published.