sara tendulkar
Sachin Tendulkar's daughter Sara Tendulkar to make her Bollywood debut soon

मुंबई : क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लाडकी सारा तेंडुलकर लोकप्रियतेच्या बाबतीत तिच्या वडिलांपेक्षा कमी नाही. तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेते. चाहत्यांच्या बाबतीतही सारा खूप पुढे आहे, फक्त इंस्टाग्रामवर तिला लाखाहून अधिक लोक फॉलो करतात. आता साराशी संबंधित एक नवीन अपडेट येत आहे.

सारा तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की, आता ते सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आहे. बॉलीवूड लाइफ या वेबसाइटनुसार, साराच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, ती बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. सूत्राने सांगितले की, “सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. तिला अभिनयात खूप रस आहे आणि तिने काही ब्रँड एंडोर्समेंट देखील केले असल्याने ती अभिनयाचे क्लास घेत आहे. साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. मात्र, साराला ग्लॅमरच्या जगात करिअर करण्यात रस आहे.”

सूत्राने पुढे सांगितले की, “बहुतेकदा प्रसिद्धीपासून दूर राहणारी सारा तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करू शकते. ती अत्यंत प्रतिभावान आहे आणि तिचे आई-वडील साराला तिच्या प्रत्येक निर्णयात साथ देतात…ते तिला खूप पाठिंबा देतात.”

काही काळापूर्वी सारा शाहिद कपूरसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी सचिन तेंडुलकरने हे वृत्त फेटाळून लावले होते आणि सारा सध्या तिच्या अभ्यासात व्यस्त असून तिचा असा कोणताही हेतू नसल्याचे सांगितले होते. आता सारा 24 वर्षांची आहे आणि ती एक मॉडेल आहे. तिचे फोटो अनेकदा चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.

Leave a comment

Your email address will not be published.