साउथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या RRR चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाच्या यशाचा आनंद घेण्यासाठी काल रात्री रामचरण मुंबईत दाखल झाला. यावेळी राम चरणाला पाहण्यासाठी लाखो लोक जमले होते. यावेळीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातील चाहत्यांचे अभिनेत्याप्रति असलेले प्रेम पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

काल रात्री राम चरण मुंबईच्या गॅलेक्सी थिएटरमध्ये पोहचला. येथे राम चरणला पाहिल्यानंतर उपस्थित असलेले चाहते सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी वेडे झाले. ज्याची छायाचित्रे थक्क करणारी आहेत. येथील प्रेक्षकांचे प्रेम पाहून सुपरस्टार राम चरणही भारावून गेलेला दिसला. या फोटोंमध्ये तो चाहत्यांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत होता. रामचरणने बॉलीवूडच्या अभिनेत्यांना मागे टाकत आपले इथल्या प्रेक्षकांमध्ये स्थान पक्के केल्याचे या फोटोमधून दिसत आहे.

दरम्यान, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपटाने बंपर कमाई करत अवघ्या 7 दिवसांत 700 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 710 कोटींची कमाई केली आहे. अजूनही हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. यासोबतच दिग्दर्शक राजामौली यांचा RRR हा चित्रपट त्यांच्या मागील ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली 2 च्या स्पर्धेत उभा आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *