एस. एस. राजमौली यांचा RRR हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिस धमाका करत आहे. काही दिवसातच चित्रपटाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या चित्रपटात अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि रामचरण मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. चित्रपटाची वाढती क्रेझ पाहता आता ज्युनिअर एनटीआरने या संदर्भात एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

ज्युनियर एनटीआरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चित्रपटावर प्रेक्षकांनि केलेल्या प्रेमाचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “तुम्ही सर्वांनी RRR वर कौतुकाचा वर्षाव केला आणि चित्रपट रिलीज झाल्यापासून आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, माझ्या कारकिर्दीतील RRR हा महत्त्वाचा चित्रपट बनवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानायला मी थोडा वेळ देऊ इच्छितो.”

“मी माझ्या चाहत्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. तुमचे बिनशर्त प्रेम आणि पाठिंब्याने मला कोविड-19 च्या अत्यंत आव्हानात्मक काळातही माझे सर्वोत्तम देण्यास प्रोत्साहन दिले. मी वचन देतो की आणखी अनेक चित्रपटांद्वारे तुम्हा सर्वांचे मनोरंजन करेन.” असं म्हणत अभिनेत्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच, त्याने चित्रपटातील कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक अश्या सर्वांचेही आभार मानले आहेत.

RRR हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात 19 कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात या सिनेमाने 17 कोटी कमावले आहेत. या सिनेमाची एकूण भारतातील कमाई 91.50 कोटी इतकी आहे. तर या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची जगभरातील कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *