बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या अपघाताने सर्वांना धक्काच बसला होता. या अपघातात मलायकाला मोठी दुखापत झाली असून तिला लवकरात लवकर रुग्णालयात नेण्यात आले होते. यानंतर आता मलायकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती डोक्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे.

या फोटोंमध्ये मलायका अरोरा डोक्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे. मलायका व्हीलचेअरवर बसली असून तिच्या आजूबाजूला अनेक लोक आहेत, जे तिला मदत करत आहेत. मलायका अरोराची बहीण अमृता अरोरा हिने अपघातानंतर हेल्थ अपडेट देताना सांगितले की, ‘तिची बहीण आता बरी आहे आणि लवकरच बरी होईल.’

दरम्यान, अपघाताच्या वेळी मलायका अरोरा तिच्या रेंज रोव्हर कारमध्ये होती, तेव्हा हे वाहन दोन कारमध्ये अडकले आणि त्यांची धडक झाली. अपघातानंतर मलायका अरोराला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिचे सीटी स्कॅन करण्यात आले. या स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल आला असतानाही तिला रुग्णालयातच रात्रभर निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मलायकाला डिस्चार्ज देण्यात आला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *