नवी दिल्ली : टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माचे वय 35 पेक्षा जास्त आहे. तंदुरुस्ती आणि व्यस्त वेळापत्रक पाहता, रोहित शर्मा दीर्घकाळ टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता फार कमी आहे. अशा परिस्थितीत निवड समिती या तीन खेळाडूंपैकी एकाला टीम इंडियाचा कसोटी कर्णधार बनवण्याचा विचार करू शकते.

जसप्रीत बुमराह :

वगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या 5 व्या कसोटी सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व केले. टीम इंडियाला तो सामना जिंकता आला नसला तरी, जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून या सामन्यात बरीच चर्चा झाली होती. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहला कसोटी संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते.

ऋषभ पंत :

लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये ऋषभ पंतचा खेळ पूर्णपणे वेगळा आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशी खेळपट्ट्यांवरही पंत हा विरोधी संघासाठी सर्वात मोठा धोका म्हणून समोर आला आहे. ऋषभ पंत अजूनही खूप तरुण आहे, अशा परिस्थितीत त्याला कसोटी संघाचे कर्णधारपद देऊन नवीन टीम इंडिया त्याच्याभोवती तयार केली जाऊ शकते.

रवींद्र जडेजा :

अष्टपैलू जडेजाला कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही पण त्याची तंदुरुस्ती आणि कसोटी सामन्यातील कामगिरी लक्षात घेता निवड समिती त्याच्या नावावरही विचार करू शकते. रवींद्र जडेजाने आतापर्यंत भारतासाठी 60 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने बॅटने 2523 धावा केल्या आहेत आणि 242 विकेट्स घेतल्या आहेत.