सौंदर्य केवळ चेहऱ्यावरूनच दिसून येत नाही तर त्यासाठी हात पाय देखील सुंदर असणे आवश्यक असते. यासाठी चेहऱ्याबरोबरच हाताच्या व पायांच्या त्वचेचीही काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आपण पाहतो की काळे पडलेले पाय लोकांचे लक्ष लगेच वेधून घेतात.

जर पाय दिसायला सुंदर असतील तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे कपडे घालू शकता व स्टायलिश शूज किंवा सॅन्डल घालू शकता. पण हेच जर काळवंडलेले असतील तर ते दिसायला चांगले वाटत नाहीत. याने शरीराची सुंदरता खराब होते.

यासाठी अनेकजण पार्लरमध्ये जाऊन पेडीक्योर करून घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की घरी अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पायांचा काळेपणा काढून टाकू शकता आणि त्यांना आकर्षक बनवू शकता.

संत्रा पावडर

संत्र्याचे अनेक फायदे आहेत. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. संत्री खाल्ल्याने तुमची त्वचा गोरी होते. याशिवाय संत्र्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. तुम्ही संत्र्याची साले साधारण आठवडाभर वाळवा. साले सुकल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून पावडर बनवा. त्यानंतर तुम्ही ते साठवून ठेवू शकता. पायाचा काळोख दूर करण्यासाठी पावडरमध्ये कच्चे दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर ते पायाला चांगले लावा आणि १५ मिनिटांनी स्क्रब करा. त्यानंतर ते धुवा. सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून 3 दिवस हे करा.

कोरफड जेल

त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफड खूप फायदेशीर आहे. कोरफडीच्या पानातून जेल काढा. त्यानंतर स्वच्छ पायांवर कोरफडीचे जेल लावा. हे सुमारे 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा. याचा रोज वापर केल्याने पायांचा काळेपणा कमी होईल.

बटाटा

पायाचा काळेपणा दूर करण्यासाठी बटाटा हा एक चांगला पर्याय आहे. बटाटा किसून त्याचा रस काढा. यानंतर त्यात तांदळाचे पीठ मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या पायावर 15 मिनिटे लावा आणि कोमट पाण्याने स्क्रब करून धुवा. यानंतर पायांना चांगले मॉइश्चरायझर लावा.

लिंबू

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते. लिंबूमध्ये नैसर्गिकरित्या ब्लिचिंग गुणधर्म आढळतात. एक लिंबू कापून थेट तुमच्या पायाच्या गडद भागावर लावा. यासोबतच त्यात साखर टाकून स्क्रबिंगही करता येते. यामुळे पायाचा काळेपणा कमी होईल.