आजकाल कोणतेच क्षेत्र असे नाही की जिथे लॅपटॉपचा वापर होता नाही. काम लहान असो मोठे ते सध्या लॅपटॉप शिवाय पूर्ण होत नाही. कोरोनापासून अनेकजण घरूनच काम करतात. तेव्हापासूनच लॅपटॉपचा वापर अधिक वाढला आहे.

यामुळे अनेकजण नवीन लॅपटॉप घेत असतात. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की लॅपटॉप कोणता घ्यायचा. याबाबत बरेचसे लोक गोंधळून जातात. काहीवेळा माहितीच्या कमतरतेमुळे कसलाही लॅपटॉप खरेदी करतात. आणि मग नंतर पश्चाताप करत बसतात.

यासाठी लॅपटॉप विकत घेण्यापूर्वी कोणता लॅपटॉप घेणे योग्य आहे. व लॅपटॉप खरेदी करताना रॅम, प्रोसेसर, स्क्रीन, स्टोरेज, बॅटरी अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. या विषयावर आज आम्ही सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

बजेट

कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यापूर्वी, बजेट किती आहे हा पहिला प्रश्न मनात येतो. त्यामुळे सर्वात आधी तुमच्या गरजेनुसार तुमचे बजेट ठरवा. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे लॅपटॉप मॉडेल्स निश्चित किमतीत उपलब्ध आहेत.

प्रोसेसर

Intel किंवा AMD CPU भारतात सध्याच्या बहुतांश लॅपटॉपमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्यानुसार प्रोसेसर निवडू शकता. इंटेलचा Core i3, i5, i7 चिपसेट प्रोसेसर यापैकी कोणताही एक लॅपटॉप निवडू शकतो.

स्क्रीन आकार

लॅपटॉपमध्ये विविध आकार उपलब्ध आहेत त्यापैकी 14 इंच आणि 15.6 इंच स्क्रीन सामान्य आहेत. हा आकार वेगवेगळ्या ब्रँडच्या लॅपटॉपमध्ये असतो. जर तुम्ही जास्त प्रवास करत असाल तर लहान आकाराचा स्क्रीन असलेला लॅपटॉप घेणे योग्य ठरेल कारण ते नेणे सोपे आहे आणि वजनानेही हलके आहे.जे लोक सतत प्रवास करत नाहीत त्यांच्यासाठी मोठ्या स्क्रीनचा लॅपटॉप योग्य असेल.

स्टोरेज

हाय डिस्क ड्राइव्ह (एचडीडी) असलेले अनेक लॅपटॉप बाजारात उपलब्ध आहेत. तथापि, आता लहान आकाराच्या लॅपटॉपमध्ये सॉलिड-स्टेट ड्राइव्ह (SDD) आहे. SDD खूप लोकप्रिय आणि जलद आहे परंतु त्यात कधीकधी कमी स्टोरेज असते. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी स्टोरेजची खात्री करून घ्या.

बॅटरी

लॅपटॉपमध्ये चांगला बॅटरी बॅकअप असणे खूप महत्त्वाचे आहे. बॅटरी बॅकअप चांगला नसेल तर पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो. अशा परिस्थितीत अनेक वेळा प्रवास करताना खूप त्रास होतो. किमान 4-6 तास लॅपटॉप चार्ज करण्याची गरज वाटत नाही.