Xiaomi ही लोकप्रिय मोबाईल कंपनी आता आपला सर्वात महागडा फोन Xiaomi 12 Pro हा लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन नवनवीन फीचर्स सह भारतीय मोबाईल बाजरपेठेत येण्यासाठी २७ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया या फोन मधील फीचर्स संदर्भात. व काय असणार आहे याची भारतातील मोबाईल बाजारपेठेतील किंमत याविषयी.

Xiaomi 12 Pro चे संभाव्य फीचर्स

Xiaomi ने चीनमध्ये लॉन्च केलेल्या या मोबाईलमध्ये ६.७३ -इंचाचा LTPO E5 AMOLED, 120hz डिस्प्ले वापरण्यात आला आहे. तसेच, हा फोन HDR १० Plus ला सपोर्ट करतो. यामध्ये डॉल्बी अॅटमॉस व्हिजनचा आधार घेण्यात आला आहे. या फोनमध्ये १२ GB रॅम आणि १५६ GB एवढा स्टोरेज आहे

याची भारतात अपेक्षित किंमत

या फोन च्या संभाव्य किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Xiaomi 12 Pro ची किंमत ६०-७० हजार रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, अधिकृत घोषणेसाठी २७ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कॅमेरा सेटअप

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे, तर दुय्यम कॅमेरा देखील ५० मेगापिक्सेलचा आहे, जो ११५ डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू कॅप्चर करू शकतो. तिसरा कॅमेरा देखील ५० मेगापिक्सेलचा आहे, जो पोर्ट्रेट लेन्ससह येतो. तर या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a comment

Your email address will not be published.