स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या Realme ने आपला Realme Narzo 50A Prime हा आज भारतात लॉन्च केला आहे. ही रिलमीच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या फोनची विक्री भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी २८ एप्रिलपासून ई-कॉमर्स साइट Amazon आणि इतर ऑफलाइन रिटेल स्टोअरवर सुरू होणार आहे.

या फोनमध्ये ६.६ -इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे, जो ६०० nits पर्यंत ब्राइटनेस देतो. हा स्मार्टफोन फ्लॅश ब्लॅक आणि फ्लॅश ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. चला तर जाणून घेऊ या स्मार्टफोनमधील फीचर्स व याची किंमत.

या स्मार्टफोन ची किंमत

भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ११,४९९ रुपये एवढी लावली असून, त्याचप्रमाणे ४ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज च्या स्मार्टफोनची किंमत १२,४९९ रुपये आहे.

Realme Narzo 50A Prime या स्मार्ट फोनमधील फीचर्स

या फोनमध्ये २४०८ x १०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह६.६ इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले आणि ६०० nits पर्यंत कमाल ब्राइटनेससह १८० Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट दर्शवते.

हा स्मार्टफोन Android ११ वर आधारित Realme UI R Edition वर काम करतो.

या स्मार्टफोनमध्ये १२ nm ऑक्टा-कोर Unisoc T६१२ SoC प्रोसेसर आणि ARM Mali-G५७ GPU आहे.

स्मार्टफोनमध्ये ४GB रॅम आणि १२८GB अंतर्गत स्टोरेज आहे, जे microSD कार्डद्वारे १TB पर्यंत वाढवता येते.

स्मार्टफोनमध्ये f/१.८ अपर्चर असलेला ५० मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, f/२.८ अपर्चर असलेला दुसरा कॅमेरा आणि f/२.४ अपर्चर असलेला तिसरा कॅमेरा स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओसाठी, फोनमध्ये f/२.० अपर्चरसह ८ -मेगापिक्सेल AI फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

या स्मार्ट फोनच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये ४ G LTE, Wi-Fi, Bluetooth v५, GPS/A-GPS,३.५mm ऑडिओ जॅक आणि USB Type-C पोर्ट आहे.

स्मार्टफोनमध्ये ५०००mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्याला १८W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Leave a comment

Your email address will not be published.