चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार रवींद्र जडेजाने सलग मिळालेल्या पराभवानंतर त्याच्यावर कर्णधारपदाचे दडपण आहे की नाही याच्यावर मुक्तपणे बोलला आहे. यावेळी त्याने एक मोठा खुलासाही केला आहे. आपल्यावर कर्णधारपदाचे कोणतेही दडपण नसल्याचे जडेजाने सांगितले.

त्याचवेळी जडेजा म्हणाला, एमएस धोनीने काही महिन्यांपूर्वी त्याला सांगितले होते की सीएसकेचे कर्णधारपदासाठी तयार रहा आणि म्हणूनच तो या आव्हानासाठी आधीच तयार होता.

रवींद्र जडेजाच्या कर्णधारपदाची सुरुवात चांगली झालेली नाही. आयपीएल 2022 मध्ये संघ सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. यादरम्यान जडेजाची स्वतःची कामगिरीही तितकीशी चांगली राहिली नाही. अशा स्थितीत जडेजावर कर्णधारपदाचे दडपण स्पष्टपणे दिसत असल्याचे अनेक दिग्गजांचे मत आहे. त्यामुळे त्याला चांगली कामगिरी करता येत नाही.

मात्र, रवींद्र जडेजाचे म्हणणे आहे की, त्याच्यावर कर्णधारपदाचे कोणतेही दडपण नाही, कारण तो त्यासाठी आधीच तयार होता. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, “एमएस धोनीने काही महिन्यांपूर्वी मला सांगितले होते की तो कर्णधारपद सोडत आहे आणि मला कर्णधारपद करावे लागेल. म्हणूनच तेव्हापासून मी त्याची तयारी करत होतो. मानसिकदृष्ट्या मी संघाचे नेतृत्व करण्यास तयार होतो. माझ्यावर कर्णधारपदाचे कोणतेही दडपण नाही. माझ्या मनात येणाऱ्या गोष्टींनुसार मी निर्णय घेत आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला एमएस धोनीच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळत आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे.”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *