मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची क्रेज आजही चाहत्यांमध्ये आहे. ही अभिनेत्री आज पडद्यावर कमी दिसत असली तरी तिच्या चाहत्यांचे प्रेम काही कमी होत नाहीये. रवीना टंडनच्या अशाच एका चाहत्यामुळे अभिनेत्री घाबरलेली होती. रवीनाच्या एका चाहत्याने तिच्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. रवीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या चाहत्यांच्या क्रेझबद्दल सांगितले आहे.

रवीना टंडनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की तिचा एक चाहता होता जो तिला पत्नी मानत होता. इतकंच नाही तर तो रवीनाच्या मुलांना त्याचीच मुले म्हणत होता. रवीना टंडनने ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘गोव्यातील एक चाहता होता ज्याचा असा विश्वास होता की मी त्याच्याशी लग्न केले आहे आणि माझी मुले त्याची मुले आहेत. तो मला त्याच्या रक्ताने लिहिलेल्या चिट्ट्या कुरियर करत असे. रक्ताने लिहिलेली पत्रे तसेच अश्लील चित्रेही तो पाठवत असे. रवीना म्हणाली, ‘एकदा तिचा पती अनिल थडानी यांच्या गाडीवर कोणीतरी मोठा दगड फेकला, त्यानंतर आम्हाला पोलिसात फोन करावा लागला.’

मुलाखतीत आणखी एका चाहत्याबद्दल बोलताना रवीना टंडन म्हणाली, असाच आणखी एक चाहता होता, जो आमच्या घराच्या गेटवर बसायचा. अभिनेत्री म्हणाली, ती अशा लोकांमुळे नाराज झाली होती, तिला लोकांच्या वेडेपणाची भीतीही वाटत होती. रवीना टंडनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री शेवटची ब्लॉकबस्टर KGF 2 मध्ये दिसली होती.