मुंबई : मराठीतील सर्वात बोल्ड वेब सीरिज ‘रानबाजार’ सध्या सोशलवर चर्चेचा विषय बनली आहे. ‘रान बाजार’ राज्याच्या राजकारणावर आधारित एक मराठी वेब सिरीज आहे. या सिरीज नाव ऐकलं तर डोळ्यासमोर नाव येतं मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक प्राजक्ता माळीचं. या सीरिजमधील अभिनेत्रीची जबरदस्त ऍक्टिंग पाहता, तिने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

दरम्यान, अजित वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ चित्रपटात मुख्य भूमिकेत प्राजक्ता माळी दिसणार आहे. प्राजक्ता शिवाय या चित्रपटात मुक्ता बर्वे, ओमकार गोवर्धन, संदीप पाठरसिका चव्हाण, सुहास शिरसाट, नंदू माधव हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘वाय’ हा चित्रपट २४ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे. प्राजक्ता माळी या चित्रपटाचा महत्वाचा भाग असणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या प्राजक्ताने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यावेळी चित्रपटाबद्दल बोलताना प्राजक्ताने तिच्या आयुष्यासंबंधित एक गोष्ट देखील सांगितली आहे.

‘रानबाजार’मधील बोल्ड सीनमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणते की, “एक कोणीतरी हिरोईन असं म्हणून मला मारायचं नाहीये, खूप काही मिळवायचं बाकी आहे. जे मला मिळवायचं आहे, असे सगळे प्रोजेक्ट्स माझ्यापर्यंत यावेत अशी मी देवाकडे प्रार्थना करते.

‘वाय’ चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “माझा रोल खूप छोटा आहे पण तितकाच महत्वपूर्ण आहे. यावेळी प्राजक्ता रिलेशनशिपमध्ये होती याचाही तिने खुलासा केला आहे. चित्रपटाची खास आठवण सांगत अभिनेत्री म्हणाली, वाय चित्रपट शूट होत होता त्यावेळेला माझं ब्रेअकप झालं होतं. मी कुठं होते माझं काय चाललंय ह्या गोष्टीसुद्धा मला नीट आठवत नव्हत्या. हा चित्रपट जेव्हा शूट करत होतो तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक मला आठवण करून देत होते की तू हा सिन करत असताना पडली होती आणि तू ह्या सिनला असं बोलली होती तुला आठवतंय? असे विचारल्यावर मी फक्त हो म्हणत होते.

पण त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर अंधार होता. मी फक्त माझ्या विचारातच गुंतलेली होते. अभिनेत्रीच्या या खुलाश्यानंतर तिला अनेकांनी धीर दिला, तसेच तू यातून लवकर बाहेर पडशील अशी अशाही चाहत्यांनी व्यक्त केली.

Leave a comment

Your email address will not be published.