मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. वास्तविक, अभिनेत्रीची नुकतीच एस सर्जरी झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीने आपली अवस्था सांगत हॉस्पिटलच्या खोलीतून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राखी सावंतचा प्रियकर आदिल दुर्रानी देखील हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घेताना दिसत आहे.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही राखी लोकांचे मनोरंजन करणे सोडत नाहीये. हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून ती तिथून सतत व्हिडिओ बनवून तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करत आहे. हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होऊनही राखीची ही सकारात्मक ऊर्जा सर्वांनाच प्रभावित करत आहे. असे सांगितले जात आहे की राखीच्या गर्भाशयाजवळ एक गाठ होती जी तिने ऑपरेशनद्वारे काढली.

पुन्हा एकदा राखी सावंतने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की ती आता घरी जाणार आहे आणि लवकरच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. यादरम्यान तिने व्हिडिओमध्ये आदिल खानलाही दाखवले आहे. त्याचबरोबर यावेळी यूजर्स तिच्या व्हिडिओची खिल्ली उडवत आहेत. खरं तर, राखीने व्हिडिओमध्ये खूप मेकअप केला आहे, त्यामुळे लोक तिला ट्रोल करत आहेत.

राखी सावंतचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे

राखीच्या व्हिडिओवर कमेंट करताना लोक लिहित आहेत, ‘हॉस्पिटलमध्येही मेकअप करण्यासाठी वेळ कसा मिळतो’ राखीने 7 तासांपूर्वी इन्स्टावर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 18 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.