मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात सामन्यात राजस्थाननं लखनौला 3 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाला 162 धावापर्यंत मजल मारता आली.

या सामन्यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर या सामन्याचा आढावा घेऊ… राजस्थान आणि लखौन यांच्यामधील हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर संध्याकाळी दव पडतात. ज्यामुळं प्रत्येक संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात.

या सामन्यातही नाणेफेक जिंकून लखनौने गोलंदाजी घेतली. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाची सुरुवात चांगली झाली. राजस्थानकडून पाचव्या क्रमांकवर खेळण्यासाठी आलेल्या शिमरॉन हेटमायरचा कॅच सुटली अन् सामना फिरला.

हेटमायर 15 धावांवर असताना क्रुणाल पांड्यानं त्याची कॅच सोडली. त्यानंतर हेटमायरनं तडाखेबाज फलंदाजी करत राजस्थानचा स्कोर 165 वर पोहचवला. या सामन्यादरम्यान राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू आर. अश्विन रिटायर्ड आऊट झाला.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की, कोणता खेळाडू रिटायर्ड आऊट होऊन माघारी परतला. राजस्थाननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं पहिल्याच षटकात चेंडू ट्रेन्ट बोल्टच्या हातात देऊन लखनौच्या संघाला दोन मोठे झटके दिले. सामना राजस्थानच्या बाजूनं झुकलेला असताना क्विंटन डी कॉकनं संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला.

परंतु, त्यालाही लखनौच्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. तो चहलच्या गोलंदाजीवर आऊट झाला. आठराव्या षटकात युजवेंद्र चहलनं 15 धावा दिल्या. ज्यामुळं लखनौला जिंकण्यासाठी 12 चेंडूत 34 धावा शिल्लक राहिल्या.

लखनौच्या संघाला अखेरच्या षटकात लखनौच्या संघाला पंधरा धावांची गरज असताना राजस्थानचा युवा गोलंदाज कुलदीप सैननं भेदक गोलंदाजी केली. त्याच्यासमोर मार्कस स्टॉयनिसचं मोठं आव्हान होतं. परंतु, त्यानं पहिल्या चेंडूवर एक धाव देऊन त्यानंतचे तीन चेंडू निर्धाव टाकत सामना राजस्थानच्या बाजूनं झुकवला.

Leave a comment

Your email address will not be published.