मोटारसायकलवरुन चंदनाच्या लाकडांची वाहतूक करणार्या सोनईतील दोघांना सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुनील एकनाथ ढोले यांनी फिर्याद दिली असून पोलीस ठाण्यात चंदन चोरी व अवैध वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, 3 एप्रिल रोजी दुपाणी एक वाजता पानेगाव ते सोनई रोडवर चिमटा रोडवरील कॅनॉलच्या कडेला गणेश बाळू शिंदे (वय 29) रा. सोनई व माणिक राजाराम डुकरे (वय 40) रा. सोनई हे 40 हजार रुपये
किंमतीची चंदनाची लहान-मोठी 20 किलो वजनाची सुंगधी लाकडे एका गोणीत भरुन मोटारसायकलवरुन बेकायदेशीरपणे चोरट्या पद्धतीने वाहतूक करताना आढळून आला.
यावेळी पोलिसांनी अंदाजे 40 हजार रुपये किमतीची चंदनाची 20 किलो लाकडे व 15 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे. दाखल फिर्यादीवरुन सोनई पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.