मुंबई : दिवंगत कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार आजही त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला. पुनीतची डॉक्यूमेंट्री जीजी (Gandhada Gudi) नुकताच प्रदर्शित झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी डॉक्युमेंट्रीसंदर्भात एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. पुनीतची पत्नी अश्विनी हिने त्यांच्या या व्हिडिओवर कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अमिताभ दिवंगत कलाकार पुनीतवर बोलताना दिसत आहेत. अमिताभच्या म्हणण्यानुसार, ‘पुनीतबद्दल बोलणे कठीण आहे. पुनीत हा एक उत्तम कलाकार होता आणि सर्वात चांगला भाग म्हणजे त्याचे स्मित. तो फक्त त्याच्या हसण्याने लोकांशी जोडला जायचा.” अमिताभ यांनी असेही सांगितले की ते पुनीतला लहानपणापासून ओळखत होते. अमिताभच्या या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये पुनीतची झलकही पाहायला मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांनी व्हिडीओमध्ये पुनीतच्या ‘गंधडा गुढी’ या चित्रपटाबद्दलही सांगितले. ते म्हणाले, ‘पुनीतचा हा चित्रपट माणूस आणि निसर्गाच्या नात्याची आठवण करून देतो.’

पुनीत राजकुमार हे कन्नड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने लहानपणापासूनच चित्रपटात काम करायला सुरुवात केली. ‘बेट्टाडा हूवू’साठी बालकलाकार म्हणून त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. जवळपास 30 चित्रपटांमध्ये काम करून पुनीतने सर्वांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते. गेल्या वर्षी २९ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.