महाअपडेट टीम, 27 जानेवारी 2022 : शिरूर – हवेली तालुक्याचे आमदार अशोकबापू पवार अन् त्यांच्या पत्नी पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सभापती सौ. सुजाता अशोक पवार या लोकांच्या सेवेसाठी 24 तास सक्रिय असतात. अनेक लोकांच्या अडी – अडचणी सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. अशीच एक अनुभूती ही दादा सखाराम पांढरे यांना मिळाली.
आज दुपारी 12:28 ला मला आमचे मित्र तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री पांडुरंग हंडाळ व आंधळगाव येथील श्री दादा सखाराम पांढरे यांचा फोन आल्यानंतर,त्यांनी सांगितले की माझी आई सौ ठकुबाई सखाराम पांढरे यांचे वाघोली येथील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करण्यात आलेले आहे,हॉस्पिटल प्रशासनाने जवळपास 47,000 रु बिल आकारले आहे,
त्यानंतर तातडीने मि पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सभापती सौ सुजाता अशोक पवार यांना फोन लावला,सदर सर्व गोष्टीची कल्पना सुजाता भाभींनी दिली, भाभींनी मला सांगितले की ,मी प्रदीपला (आ. अशोक बापू यांचे स्वीय सहाय्यक) या गोष्टीची कल्पना देते, त्याच्याशी संपर्क करा, त्यानंतर मी श्री.प्रदीप जाधव यांच्याशी संपर्क केला व त्यांनी सांगितले भाभींनी मला या गोष्टीची कल्पना दिलेली आहे
त्यानंतर प्रदीप जाधव यांनी तेथील हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधून बिलामध्ये सवलत देण्याची विनंती केली आणि. विशेषतः हे हॉस्पिटल खाजगी असताना देखील भाभीच्या एका फोनमुळे सामान्य कुटुंबाला बिलामध्ये सात हजार रुपयाचा सवलत मिळाली.
त्याबद्दल मी सौ सुजाता भाभींचे व श्री प्रदीप जाधव यांचे फोन करून मनःपूर्वक आभारी व्यक्त केले.