पीएमपीचा (PMP) वर्धापनदिन १९ एप्रिल रोजी साजरा केला जाणार असून या काळात संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आता पुणे (Pune) महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ने एक खास सुविधा आणली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ने तिकिटासाठी ‘डिजिटल पेमेंट’चा (Digital Payment) पर्याय उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टर (Conductor) यांच्यात सातत्याने होणाऱ्या वादाला आळा बसू शकतो.

पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मोबाइल ॲपद्वारे (Mobile App) तिकीट काढता येणार आहे. प्रवाशांनी ॲपमधून पैसे भरल्यानंतर त्यांना ‘क्यूआर कोड’ प्राप्त होणार असून, वाहक त्यांच्याकडील तिकीट मशिनद्वारे तो कोड स्कॅन करून तिकिटाची खात्री करतील.

पुणे महानगर परिवहन महामंडळाची ही सुविधा येत्या पंधरवड्यात ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच १९ एप्रिल रोजी ‘पीएमपीएमएल’ (PMPML) या मोबाइल ॲपचे उद्घाटन केले जाणार असून, त्याद्वारे नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

ॲपमधील इतर सुविधा

– ॲपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील.

– पीएमपीएमएल ॲपमधून मेट्रोचे तिकीट काढणे शक्य आहे.

– पीएमपीच्या मार्गांची सविस्तर माहिती.

– बसचे वेळापत्रक.

– पीएमपीचे विविध पास ॲपद्वारे ऑनलाइन काढता येणार.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *