महाअपडेट टीम, 4 मार्च 2022 : तब्बल दोन वर्षांनी भरलेली जत्रा अन् त्यानिमित्ताने झालेली गर्दी..यानिमित्ताने यात्रेला आलेल्या जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांना जत्रेत फिरण्याचा अन् बांगड्या भरण्याचा मोह मात्र टाळता आला नाही.
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील वाघेश्वर देवस्थानची यात्रा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.या यात्रेनिमित्त पुणे जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी श्री वाघेश्वर मंदिरात येऊन दर्शन घेतले.
यात्रेनिमित्त बाजारात झालेली तुफान गर्दी… महिलांची सुरू असलेली खरेदीसाठी लगबग पाहता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सुजाता पवार यांनी देखील यात्रेत फिरण्याचा आनंद लुटला. दरम्यान बांगड्या भरण्याचा मोह त्यांना आवरला नाही.
त्यांनी खरेदी विक्री संघाच्या संचालिका सुजाता नरवडे यांच्यासह बांगड्या भरल्या, खरेदीही केली. महिला व मुलींनी यावेळी भाभी आल्याचे पाहताच सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. सुजाता पवार यांनी देखील सर्वांसोबत सेल्फी काढली. यावेळी स्थानिक यात्रा समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी खरेदी विक्री संचालिका सुजाता नरवडे, प्रतिभा बोत्रे, धनंजय फराटे, सोमनाथ फराटे, राजेंद्र पोळ, शरद चकोर आदी उपस्थित होते.