महाअपडेट टीम, 15 फेब्रुवारी 2022:-पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी आज विद्यमान संचालिका सौ.केशर ताई सदाशिव पवार यांनी शिरूर तालुका सर्वसाधारण अ वर्गातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला.
यावेळी आमदार श्री.अशोक बापू पवार यांच्या पत्नी सौ.सुजाता भाभी पवार ,मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.देवदत्त निकम साहेब,तालुकाध्यक्ष श्री.रवी बाप्पू काळे,पंचायत समिती सभापती शिरूर सौ.मोनिकाताई हरगुडे,
सौ.सुजाता ताई नरवडे ,उद्योजक श्री.विकास नाना गायकवाड,हिवरे गावच्या सरपंच सौ .शारदा ताई गायकवाड ,दूध संघाचे विद्यमान संचालक बाळासाहेब खिलारी साहेब,सौ.ज्योतीताई मानसिंगभैया पाचुंदकर ,
श्री.सदाशिव आण्णा पवार,जातेगावचे उपसरपंच श्री.गणेशआण्णा उमाप,तंटामुक्तीचे अध्यक्ष पै.अनिल भाऊ होळकर,करंदी गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री.संदीप ढोकले,केंदुर गावच्या मा.सरपंच सौ.मीनाताई साकोरे ,सौ. साधनाताई जगताप सौ.वंदनाताई प्रकाशबापू पवार इत्यादी मान्यवर उपस्थित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.