आजकाल कमी वयातच डोक्यावरील केस पांढरे होण्याची समस्या वाढत चालली आहे. यामुळे अनेकजण त्रस्त असतात. हे पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी अनेकजण बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरत असतात. पण हे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.

पण केसांच्या आरोग्यासाठी संतुलित व पोषकतत्वांनीयुक्त आहार खूप आवश्यक असतो. असा आहार न घेतल्यामुळे केसांच्या समस्या वाढतात. यामुळे केस लवकर पांढरे होतात. चला तर मग जाणून घेऊया केसांच्या आरोग्यासाठी आहारात काय खायला हवं, ज्यामुळे तुमचे केस काळे होऊ शकतात.

आहारात अंड्यांचा समावेश करा

अंडी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात. केस सुधारण्यासाठी आणि पांढऱ्या केसांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश केलाच पाहिजे.

दही खाल्ल्याने केस पांढरे होणार नाहीत

दह्यामध्ये व्हिटॅमिन-बी12 भरपूर असते, जे केस काळे ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही उन्हाळ्यात दही लस्सी बनवूनही याचे सेवन करू शकता.

आहारात मेथीचा समावेश करा

मेथी केस काळे होण्यास मदत करते. वास्तविक, मेथीमध्ये लोह आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे केसांमध्ये मेलेनिन नावाचे घटक वाढवण्यास सक्षम असते. माहितीसाठी, मेलेनिनच्या कमतरतेमुळे केस लवकर पांढरे होऊ लागतात. त्यामुळे मेलॅनिन असलेल्या अशा पदार्थांचे सेवन करावे.

हिरव्या भाज्या देखील मदत करतील

याशिवाय तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश जरूर करावा. व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन बी-12 आणि इतर पोषक तत्त्वे हिरव्या भाज्यांमध्ये आढळतात.