मुंबई : बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनाससोबत 1 डिसेंबर 2018 रोजी राजस्थानमध्ये एका ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’मध्ये लग्न केले ज्यामध्ये फक्त तिच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले होते. 2022 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आई-वडील बनलेले प्रियांका आणि निक यांनी आपल्या मुलीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ असे ठेवले आहे. दरम्यान अजूनही प्रियंकाने आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.

प्रियांकाने गेल्या काही महिन्यांत अनेक कौटुंबिक फोटो शेअर केले होते परंतु कोणत्याही फोटोमध्ये तिच्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता. पण आता पहिल्यांदाच प्रियांकाने तिच्या मुलीचा चेहरा जगाला दाखवला आहे.

तुमच्या माहितीसाठी, प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, आणि या ग्लोबल स्टारने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामच्या स्टोरीज फीचरद्वारे हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने पहिल्यांदाच तिच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

मालती मेरी चोप्रा जोनासच्या या फोटोमध्ये मालती छोट्या खुर्चीत झोपलेली आहे. या थंडीच्या मोसमात मालतीने स्वेटर घातलेला आहे. यासह तिने गुलाबी रंगाची टोपी देखील घातली आहे, प्रियंकाने हाच फोटो सोशलवर शेअर केला आहे. या फोटोत जरी पप्रियांकाच्या मुलीचा चेहरा पूर्ण दिसत नसला तरी देखील तिची एक झलक पाहायला मिळत आहे, या फोटोवरून प्रियांकाची लेक वडिल निक जोनास सारखी दिसते असे कळून येत आहे. प्रियांकाच्या लेकीची इलक पाहून चाहतेही खूप खुश झाले आहेत, तसेच तिचा गोंडस अवतार पाहून या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव देखील करत आहेत.