शनिवारी मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुढीपाडवा मेळाव्याचं आयोजन केलं होते. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केले. त्यांच्या या भाषणाने अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या दरम्यानच आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरेंचं आणि त्यांच्या भाषणाचं कौतुक केलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने या भाषणाचा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच हा व्हिडिओ शेअर करताना या पोस्टमध्ये प्राजक्ता म्हणाली की, “नाही नाही..मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयूष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती. ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करतेय. इतकाच हेतू.”
“कलाकार नंतर आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे; त्याच्या समृद्धी करता पण झटायला हवं. जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसच हेही .. , म्हणून हा घाट. (After all आता माझ्या आधार कार्ड वर मुंबईचा पत्ता आहे), असे प्राजक्ताने लिहिलं आहे.