महाअपडेट टीम, 31 जानेवारी 2022 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 24 जानेवारी रोजी कोरोनाची लागण कोरोनाची लागण झाल्याने कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्र चिंतेत पडला होता. 

परंतु पवार साहेबांनी अवघ्या 7 चं दिवसांत कोरोनावर मात केली आहे.  शरद पवार यांनी स्वतः ट्विट करून टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, माझी तब्येत आता चांगली आहे. मला कोरोना झाल्यानंतर मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, ते माझे सर्व सहकारी, मित्र, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांचा कोरोना रिपोर्ट 24 जानेवारीला पॉझिटिव्ह आला होता. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षण जाणवत असल्याचं आढळून आलं होतं.त्यानंतर आपल्या संपर्कात असलेल्या लोकांनी टेस्ट करुन घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली होती.

तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच पवारांनी उपचार घेतले होते. अखेर उपचाराअंती शरद पवारांनी कोरोनावर मात केली आहे. खुद्द पवार यांनी ट्वीट करून कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती दिली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *