बदलत्या ऋतूचा आपल्या आरोग्यावर लगेच परिणाम होत असतो. मग यात वृद्ध असो की लहान मुलं लगेच आजारी पडतात. याकाळात सर्दी- खोकला ही सामान्य समस्या लहान मुलांमध्ये दिसते.

बऱ्याचदा आपण पाहतो हलकीशी सर्दी झाल्यास पालक घरी उपलब्ध असलेली औषधे मुलांना देतात. पण हे करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवा. मुलांना औषध देण्यापूर्वी प्रत्येक पालकाने कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.

औषध देण्यापूर्वी घ्या ही खबरदारी

औषधावर लिहिलेल्या सूचना वाचा

मुलांना औषध देण्यापूर्वी, औषधाच्या बाटलीवरील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.

मुलांना वयानुसार औषध द्या

फक्त तुमच्या मुलांच्या वयासाठी योग्य असलेली उत्पादने वापरा. तसेच तुमच्या मुलाच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी फक्त औषध द्या. अतिरिक्त औषधे अजिबात देऊ नका.

मोजण्यासाठी चमचा वापरा

औषधाचा डोस देण्यासाठी, सामान्यतः औषधासोबत येणारी औषध मोजणारे टोपण वापरा.

काय करू नये

ऍस्पिरिन किंवा ऍस्पिरिन असलेली उत्पादने 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कधीही देऊ नयेत. याशिवाय मुलांना मर्ज बरा करण्यासाठी दोन-चार औषधे एकत्र देऊ नयेत.

सर्दी झाल्यास काळजी घ्या

-मुलांना समजावून सांगा की तुमचे हात नेहमी साबणाने आणि पाण्याने सुमारे 20 सेकंद धुवा. अनेक सामान्य संक्रमण टाळण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.
-खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. जर टिश्यू पेपर नसेल तर तोंडासमोर कोपर ठेवून खोकला किंवा शिंक घ्या.
-जर मुलाला फ्लू सारख्या संसर्गाने त्रास होत असेल तर त्याची घरीच काळजी घ्या. संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी इतर लोकांशी संपर्क टाळा.
-ताप बरा झाल्यानंतर किमान २४ तास मुलाला घरी ठेवा.