पाकिस्तानमध्ये आज नव्या पंतप्रधानांची निवड करण्यात येणार आहे. पीएमएल-नवाजचे अध्यक्ष शाहबाज शरीफ (७०) पंतप्रधानपदासाठी विरोधकांचे संयुक्त उमेदवार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, आज शाहबाज संबंधित १४०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालय निकाल देणार आहे.
दरम्यान आज सोमवार रोजी दुपारी नॅशनल असेंब्लीची बैठक सुरू होऊन नवा पंतप्रधान निवडला जाणार आहे. तत्पूर्वी इम्रान यांच्याविरोधात रविवारी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला होता. उमेदवारी अर्ज भरताना शाहबाज म्हणाले की, राष्ट्रीय सद्भावनेस माझे प्राधान्य आहे.
भारतासोबत शांतता हवी आहे, मात्र काश्मीरच्या मुद््द्यावरील उपायाशविाय शांतता शक्य नाही. त्यामुळे आम्ही काश्मीरच्या मुद्द्यावर भारताशी चर्चा करू. इम्रान सरकारमध्ये मंत्री राहिलेले फवाद चौधरी म्हणाले, शाहबाज यांच्या निवडीवर पक्षाचे सर्व खासदार राजीनामा देतील.
नवाज, शाहबाज मोठे व्यावसायिक आहेत. त्यांच्याशी संबंधित कंपन्या भारतासोबत व्यावसायिक संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे या दिशेने काम होऊ शकते. भ्रष्टाचाराच्या अनेक खटल्यांचा सामना करत असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आदरपूर्वक पाकिस्तानात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. नवाज शाहबाज यांचे ते मोठे बंधू आहेत.