मुंबई : T20 World Cup 2022 मध्ये, पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर बांगलादेशचा या स्पर्धेतील प्रवास इथेच संपला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून केवळ 127 धावा करता आल्या, हे लक्ष्य पाकिस्तानने 18.1 षटकात 5 गडी गमावून पूर्ण केले. गट-2 मधून पाकिस्तानशिवाय भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

शाहीन आफ्रिदीने (22 धावांत 4 बळी) केलेल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे पाकिस्तानने बांगलादेशला T20 विश्वचषकाच्या ‘करो किंवा मरो’ सामन्यात 8 बाद 127 धावांवर रोखले. डावखुरा सलामीवीर नजमुल हुसेन अवघड खेळपट्टीवर 48 चेंडूत 54 धावांची खेळी केली पण बांगलादेशला शेवटी धावा करता आल्या नाहीत कारण आफ्रिदी पाठोपाठ विकेट घेत होता. आफ्रिदीने 22 धावांत चार विकेट घेतल्या.

बांगलादेशसाठी नजमुल हुसेनने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकावले. यादरम्यान तो उत्कृष्ट लयीत दिसला. लिटन दास लवकर बाद झाल्यानंतर शांटो आणि सौम्य सरकार (20 धावा, 17 चेंडू, एक चौकार, एक षटकार) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागीदारी करून बांगलादेशसाठी चांगला पाया रचला. यावेळी संघ 150 हून अधिक धावा करेल असे वाटत होते पण त्यानंतर शादाब खानने (30 धावांत 2 बळी) विकेट घेतले.

128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी संघाकडून यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 32 धावा केल्या. त्याने 32 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याच्याशिवाय मोहम्मद हरीसने 18 चेंडूंत 1 चौकार आणि दोन षटकारांसह 31 धावांचे योगदान दिले. शान मसूद 24 धावांवर नाबाद परतला. बांगलादेशकडून कर्णधार शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, इबादत हुसेन आणि नसुम अहमद यांनी १-१ विकेट घेतली.