पाकिस्तानचा कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझमने मंगळवारी (29 मार्च) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत शानदार अर्धशतक झळकावून एक विशेष विक्रम केला. आझमने ७२ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. यासोबतच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा पूर्ण केल्या.

बाबर आझम एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावांचा टप्पा गाठणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. अवघ्या 82 डावात त्याने ही कामगिरी केली आहे. या प्रकरणात पहिल्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला आहे, ज्याने 81 डावांमध्ये 4000 वनडे धावा पूर्ण केल्या आहेत.

मात्र, बाबरने या बाबतीत सर व्हिव्हियन रिचर्ड्स (88 डाव), जो रूट (91 डाव) आणि विराट कोहली (93 डाव) यांना मागे टाकले. हा आकडा गाठणारा बाबर सर्वात वेगवान आशियाई फलंदाज ठरला आहे.

याआधी, सर्वात जलद 4000 वनडे धावा पूर्ण करण्याचा विक्रम मोहम्मद युसूफच्या नावावर होता, ज्याने त्यासाठी 110 डाव खेळले होते.

बाबरने भलेही एक खास विक्रम आपल्या नावावर केला असेल पण त्याला 88 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 गडी गमावून 313 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 45.2 षटकांत सर्वबाद 225 धावांत आटोपला. बाबरशिवाय सलामीवीर इमाम-उल-हकने पाकिस्तानकडून शानदार शतक झळकावले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा पूर्ण करणारे खेळाडू

हाशिम आमला – 81 डाव

बाबर आझम – 82 डाव

सर व्हिव्हियन रिचर्ड्स – 88 डाव

जो रूट – 91 डाव

विराट कोहली – 93डाव

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *