औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकाराचा महिला कीर्तनकारासोबत संभोग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी कीर्तनकारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन करत तृप्ती देसाईंनी मागणी केली आहे.

कीर्तनकाराने महिला कीर्तनकारासोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्याची ही कृती कीर्तनकार पेशा, महिलांची प्रतिष्ठा आणि सामाजिक नीतीमूल्ये यांना पायदळी तुडवणारी असल्याची टीका देसाईंनी केली आहे.

पुढे बोलत्यानं देसाई म्हणाल्या,खरं तर, दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आत जी नैसर्गिक क्रिया केली आहे, त्याचा सार्वजनिक व्हिडीओ चित्रित करुन व्हायरल करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

जे कीर्तनकार उपदेश देतात, समाज प्रबोधन करतात, तेच जर असे विकृत वागायला लागले, तर त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे.” असं मत तृप्ती देसाईंनी व्यक्त केलं.

नेमकं प्रकरण काय ? जाणून घ्या सविस्तर औरंगाबाद जिल्ह्यातील एका कीर्तनकाराचा पॉर्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत एका महिला कीर्तनकारासोबत तो शारीरिक संबंध ठेवत असल्याचे दिसून येत आहे. व्हायरल व्हिडीओतील कीर्तनकार महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध आहेत. यानंतर वारकरी संप्रदाय संघटनेकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

Leave a comment

Your email address will not be published.