सद्यस्थितीत मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे.कित्येक लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. याने रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होत असते. जी नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे असते. अशावेळी आहारात भेंडी खाणे खूप फायद्याचे ठरते.

मधुमेहींच्या आहारात भेंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. व मधुमेहापासून आराम मिळतो. तर मग जणू घ्या भेंडीचा आहारात कशाप्रकारे वापर करावा.

भेंडीचे सेवन कसे करावे

भेंडी जरी शिजवून खाल्ली जात असली तरी मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी भेंडी खात असाल तर ती कच्चीच खावी. भेंडीमध्ये असलेले फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते.

भेंडीचे पाणी कसे बनवायचे

जर तुम्हाला तुमची साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर भेंडीच्या पाण्याचे सेवन अवश्य करा.अशा प्रकारे बनवा भेंडीचे पाणी.

१ दोन भेंड्या घ्या आणि त्या चांगल्या धुवा.
२ आता या भेंड्याच्या पुढचा आणि मागचा भाग कापून टाका.
३ त्यात एक पांढरी चिकट गोष्ट बाहेर येईल.
४ आता ही चिरलेली भेंडी पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये टाकून झाकून ठेवा.
५ आता सकाळी रिकाम्या पोटी त्या भेंडी ग्लासमधून काढा आणि ते पाणी प्या.

मधुमेहासाठी भेंडी किती फायदेशीर आहे

सेवन केवळ मधुमेहासाठीच नाही तर किडनीच्या समस्यांवरही खूप फायदेशीर ठरते. मधुमेहाने त्रस्‍त लोकांना अनेकदा अशा भाज्या खाण्‍याचा सल्ला दिला जातो, ज्यामध्‍ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते आणि अशा स्थितीत भेंडीमध्‍ये फक्त २०% ग्लाइसेमिक इंडेक्स आढळतो. त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर आहे.

Leave a comment

Your email address will not be published.