बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांचे नाव इंडस्ट्रीतील अशा स्टार्सच्या यादीत समाविष्ट आहे ज्यांनी आपल्या करिअरसोबतच आपल्या कुटुंबाला पूर्ण वेळ दिला आहे.

काजोल आणि अजय प्रमाणेच त्यांची मुलगी न्यासा देवगन देखील नेहमीच चर्चेत असते. न्यासाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसेल, परंतु सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत. इंस्टाग्रामवर तिच्या नावावर अनेक फॅन अकाउंट आहेत, ज्यावर तिचे चाहते न्यासाचे नवीन फोटो शेअर करत असतात. आज काजोल आणि अजयची लाडकी मुलगी न्यासा हिचा वाढदिवस आहे. यावेळी अजयने आपल्या मुलीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता अजय देवगणने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर न्यासा देवगणचा एक खास फोटो शेअर केला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी, न्यासा मुलगी म्हणून मिळाल्याबद्दल त्याने स्वतःला भाग्यवान असल्याचे म्हंटले आहे. न्यासाचा फोटो पोस्ट करत अजयने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मुलगी, तू खास आहेस, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा न्यासा. तुला मिळवणं हे माझं भाग्य आहे.’ या फोटोमध्ये न्यासा काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. अजयने पोस्ट करताच सोशल मीडियावर प्रत्येकजण न्यासाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.

काजोलची मुलगी न्यासा देवगन सिंगापूरमध्ये शिकत आहे. मात्र या वर्षी जुलैमध्ये ती भारतात परतली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे न्यासा गेल्या वर्षी सिंगापूरहून भारतात आली होती. काही दिवसांनी परिस्थिती सामान्य झाल्यावर न्यासा परत गेली. न्यासासोबत तिची आई काजोलही सिंगापूरमध्ये तिच्यासोबत राहिली होती.

Leave a comment

Your email address will not be published.