बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अजय देवगण आणि काजोल याची मुलगी न्यासा देवगण ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असताणा दिसत आहे. चाहत्यांनी न्यासाच्या सोशल मीडिया पोस्टसह तिचे स्पॉट केलेले व्हिडिओ उघडपणे लाईक केले आहेत. तसेच उत्तम प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 

न्यासाने एका एपिसोडमध्ये स्टारकिडचा एक डान्स व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती ऐश्वर्या रायच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसून आली आहे.

न्यासा देवगणचा व्हिडिओ तिच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ स्टारकिडच्या शाळेतील फंक्शनचा आहे. त्यामध्ये ती काळ्या फुलांच्या स्लीव्हज टॉपसह लाल स्कर्टमध्ये ऐश्वर्या रायच्या प्रसिद्ध गाण्या ‘कजरारे’वर मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसत आहे.

यासोबतच आणखी एक क्लिप इंटरनेटवर फिरत आहे. त्यामध्ये न्यासा तिची आई काजोलच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. न्यासा अतिशय सुंदरपणे नाचताना दिसत आहे. ते पाहून चाहते खूश झाले आहेत. यासोबतच लाइक्स आणि कमेंट्समधूनही प्रेमाचा वर्षाव होताना दिसत आहे.

न्यासा देवगनच्या डान्स व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘ही तर फक्त सुरुवात आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘ये भी सुपरस्टार बनेगी.’ असे कमेंट करत चाहत्यांनी कौतुक केले आहे.

इतर चाहते देखील काजोलच्या प्रिय व्यक्तीचे कौतुक करताना हार्ट आणि फायर इमोजी टाकताना दिसले आहेत. न्यासाने अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक केला होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *