नवी दिल्ली : अभिनेत्री नोरा फतेही तिच्या जबरदस्त डान्समुळे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे, नोरा सोशल मीडियावर देखील खूप प्रसिद्ध आहे, देशाबाहेर देखील तिची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात आहे. नोराच्या या लोकप्रियतेमुळेच तिला कतारमध्ये होणाऱ्या FIFA विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली.

फिफा वर्ल्ड कप 2022 च्या फॅन फेस्टिव्हलमध्ये नोराने जबरदस्त डान्स केला. मात्र यावेळी नोरा कडून एक मोठी चूक झाली त्यामुळे तिच्या अचडणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तिने केलेल्या या कृत्यामळे तिला ट्रोल देखील केले जात आहे.

या कारणामुळे वाढणार नोराच्या अडचणी?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे, या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, नोरा हातात भारताचा तिरंगा घेऊन जय हिंद जय हिंदच्या घोषणा देत आहे. व्हिडिओमध्ये नोरा पुढे म्हणते, “भारत फिफा वर्ल्ड कपमध्ये नसला तरी आम्ही या फेस्टचा एक भाग आहोत. आमच्या संगीतातून, नृत्यातून आम्ही याचा एक भाग आहोत.” नोराचे हे शब्द ऐकून तिथे उपस्थित लोक उत्साहित होतात. नोरासोबतच प्रेक्षकही जय हिंदचा जयघोष करतात. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पण, यावेळी नोरावर चुकीच्या पद्धतीने तिरंगा फडकवण्याचा आणि त्याचा अपमान केल्याचा आरोप आहे. सर्वप्रथम नोराला स्टेजवर फेकून तिरंगा देण्यात आला. स्टेजवर पडलेला झेंडा उचलताना नोरा देशाचा तिरंगा नसून स्कार्फ असल्यासारखे उचलताना दिसते. पुढे जेव्हा नोराने तिरंगा उलटा फडकावला तेव्हा हद्दच पार झाली. स्टेजवरून खाली उभ्या असलेल्या व्यक्तीला नोराने ज्या पद्धतीने तिरंगा परत केला त्यावरही टीका होत आहे. तिरंग्याचा अपमान केल्या प्रकरणी नोराच्या अडचणीत वाढू शकतात.

नोरा फतेहीने तिरंगा चुकीचा धरल्याने, तो उलटा फडकवल्याने वाद निर्माण झाला आहे. यूजर्स देखील तिला ट्रोल करत आहेत. एका व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिले, “तिरंगा चुकीचा पकडला गेला आहे.” दुसऱ्याने लिहिले, “तिरंगा देण्याची पद्धत अत्यंत चुकीची होती.” नोरा फतेहीच्या या कृतीमुळे लोक खूप निराश झाले आहेत. मात्र या सर्व प्रकरणी नोरा कडून अजूनही काही वक्तव्य आलेले नाही.